ऑनलाईन टीम / श्रीनगर :
मागील तीन वर्षांत वैध व्हिसावर अल्प कालावधीसाठी पाकिस्तानात गेलेले जवळपास 100 काश्मिरी तरुण परत आले नाहीत. तर काही जण परत आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे तरुण पाकच्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील होऊन दहशतवादी गटांची संभाव्य स्लीपर सेल बनली आहेत, अशी भीती सुरक्षा यंत्रणांना वाटत आहे.
सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उत्तर काश्मीरमधील हंदवाडा सीमा भागाच्या जंगलात पाच दहशतवादी ठार झाल्यानंतर त्यामधील एक दहशतवादी स्थानिक नागरिक असल्याचे समोर आले होते. तो 2018 मध्ये पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर तो परतलाच नव्हता.
एक ते सहा एप्रिल 2019 दरम्यान दक्षिण काश्मीरच्या शोपिया, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांतील तरुण दहशतवाद्यांच्या गटात घुसखोरी करताना दिसले. ते सर्वजण व्हिसा घेऊन घेऊन पाकिस्तानात गेले आणि त्यानंतर कधीही परतले नाहीत.









