ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कर्जबाजारी पाकिस्तानने आर्थिक गणितं जुळवण्यासाठी पेट्रोलच्या दरात 25 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पाकच्या नागरिकांना पेट्रोल 100.10 रुपये प्रतिलीटर दराने खरेदी करावे लागत आहे.
पाकिस्तान सरकारने डिझेलच्या किंमतीतही 21.31 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे डिझेलचा दरही प्रतिलीटर 100.14 एवढा झाला आहे. तर केरोसीन आणि लाईट डीझेल ऑईलच्या दरातही अनुक्रमे 23.50 आणि 17.84 रुपयांची वाढ झाली आहे.
भारतातही पेट्रोल-डिझेल दरवाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मागील 21 दिवसांपासून भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. मुंबईत पेट्रोल 86.91 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 78.51 रुपये प्रतिलीटर आहे.









