ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तान मध्ये देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.पाकिस्तानमध्ये मागील चोवीस तासात 2 हजार 145 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामूळे 40 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात 2145 रुग्ण वाढल्याने पाकिस्तानातील एकूण रुग्ण संख्या आता 2 लाख 57 हजार 914 वर पोहचली आहे. तर आता पर्यंत 5 हजार 426 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत 1 लाख 78 हजार 737 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आतापर्यंत आढळलेल्या 2 लाख 57 हजार 914 मधील सिंधमध्ये आतापर्यंत 1 लाख 8 हजार 913 रुग्ण, पंजाबमध्ये 88 हजार 539 , खैबर – पख्तूनख्वामध्ये 31 हजार 217, बलूचिस्तानमध्ये 11 हजार 322, गिलगित – बाल्टिस्तानमध्ये 1,750 आणि पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमधील 1,771 रुग्णांचा समावेश आहे.
सद्य स्थितीत 73 हजार 751 रुग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 16 लाख 52 हजार 183 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.