ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय सोमवारी (दि.19) मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.
वाघा बॉर्डरवरुन हे भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात येणार आहेत. या नागरिकांसाठी उच्चायुक्त कार्यालयाकडून काही मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. भारतात परतणाऱ्या सर्व नागरिकांनी नियोजित वेळेत वाघा बॉर्डरवर हजर राहण्यास सांगितले आहे. सर्वांना मास्क बंधनकारक असेल. तसेच त्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागणार आहे.
भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने सप्टेंबर महिन्यातच 96 ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि 37 भारतीय नागरिक अशा एकूण 133 नागरिकांना भारतात परत पाठवणार असल्याचे सांगितले होते.









