ऑनलाईन टीम/ तरुण भारत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amarinder singh) हे पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलमसोबतच्या मैत्रीमुळे सतत विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम (pakistani reporter aroosa alam) हिच्या कथित आयएसआय (ISI) संबंधांवरून टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या अफेराच्याही चर्चाही केल्या जात आहेत. या सगळ्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानच्या माजी पत्रकार अरुसा आलम यांनी दिल आहे.
पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांचे आयएसआय आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी असलेल्या कथित संबंधांची जोरदार चर्चा सध्या पंजाबच्या राजकारणात सुरू आहेत. यावर पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम स्वत: पुढे येत त्यांनी आयएसआय आणि अमरिंदर सिंग यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अरुसा आलम यांनी अमरिंदर सिंग यांच्यासोबतचे कथित प्रेमप्रकरणाचे आरोप फेटाळून लावत. आम्ही फक्त चांगले मित्र आहेत पण प्रेमी नाही. “जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते ६६ वर्षांचे होते आणि मी ५६ वर्षांची होते. या वयात कोणीही प्रियकराच्या शोधात नाही. आम्ही अशा वेळी भेटलो जिथे प्रेम आणि रोमान्सला स्थान नाही. आम्ही चांगले मित्र आहोत, आम्ही सोलमेट आहोत, आम्ही प्रेमी नाही,” असे अरुसा आलम म्हणाल्या.
इतर नेत्यांबरोबर आरुसा आलम यांचे फोटो
तर अमरिंदर सिंग यांच्यावर टीका होत असताना त्यांनी प्रत्युत्तर देत आरुसा आलम यांचे १४ फोटो त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलेत, ज्यात त्यांच्यासोबत सोनिया गांधी, सुषमा स्वराज, मुलायम सिंह यादव, अमर सिंह, अश्विनी कुमार, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, श्याम सरन आणि माजी लष्करी अधिकारी आहेत. जगजीत सिंग यांचाही अरोरासोबत फोटो आहे.









