ऑनलाईन टीम
भारतीय सीमा रेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या कुरापती काही केल्या कमी होत नाहीत. पाकिस्तानकडून ड्रोनच्या कारवायांमध्ये कुरापती सुरुच आहे. याआधी भारतीय जवानांनी पाकिस्तानचे हे डाव उधळून लावले आहेत. यानंतर आज पुन्हा जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे सोडलेल्या शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला. पाकिस्ताकडून ड्रोनने टाकलेल्या पॅकेटमधून एक AK-47, तीन पाकिस्तानी मासिकं, 30 काडतूस आणि एक दुर्बिण जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फलाईन मंडळाच्या सौंजना गावात हे शस्त्र टाकण्यात आले होते.
पाकिस्तानकडून शस्त्रसाठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सौंजना गावात पोलिसांनी गावाला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली होती. त्यादरम्यान वायरच्या सहाय्याने बांधलेले पिवळे पॅकेट सापडले. त्यात ही शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे.
पाकिस्तानकडून ड्रोनच्या कारवायांमध्ये गेल्या एक वर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. यामुळे भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. गेल्या वर्षभरात सुरक्षा दलांनी दोन ड्रोन पाडले असून, अनेक रायफल, अत्याधुनिक उपकरणे, बॉम्ब आणि मादक द्रव्ये यासह मोठ्या प्रमाणात पेलोड जप्त केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









