ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात हिंदू, शीख आणि ख्रिश्चन समाजातील मुलींवर अत्याचार आणि त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटना अजूनही सुरूच आहेत. अलीकडेच सिंध प्रांतातील बलुचिस्तानात एका हिंदू शिक्षिकेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. या शिक्षिकेचे नाव एकता वरून आयशा ठेवण्यात आले आहे.
या शिक्षिकेने जबरदस्तीने धर्मांतर झाल्याची तक्रार करूनही स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनीही या मुद्द्यांवर मौन बाळगले आहे.
मात्र, अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मायनॉरिटी संस्थेने या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संस्थेने म्हटले आहे की, पाकिस्तानात जबरदस्तीने धर्म बदलणे स्वाभाविक झाले आहे. त्यामुळे एक दिवस पाकिस्तानच्या झेंड्याचा पांढरा रंग नाहीसा होईल. हा पांढरा रंग पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचे प्रतिबिंब आहे.









