ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात सत्तापालट होत असतानाच आज सियालकोटमधील लष्करी तळावर साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटामुळे लष्कराच्या तळाला मोठी आग लागली असून, मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्फोट झालेले ठिकाण लष्कराच्या दारुगोळय़ाचे साठवण क्षेत्र असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, या स्फोटासंदर्भात अधिक माहिती समोर आली नाही.









