ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पारंपरिक युद्ध होणार नाही. ते अण्विक युद्ध असेल, अशी धमकी
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला दिली आहे.
पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर ते पारंपरिक युद्ध नसेल. पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करेल. पाकच्या अणुहल्ल्याची पोहोच आसामपर्यंत आहे. मुस्लिमांचा जीव वाचवून आम्ही हा हल्ला करू, तसेच हे भारतासोबतचे अखेरचे युद्ध असेल.’ असे रशीद यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.
भारताचे नाव न घेता रशीद यांनी अनेकदा भारताला युद्धाच्या धमक्या दिल्या आहेत. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत. ते अचूक लक्ष्य गाठू शकतात, हे भारताने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.









