ऑनलाईन टीम / सियोल :
दक्षिण कोरियात पाकिस्तानच्या दोन दुतावासांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. दक्षिण कोरियातील योंन्गसान येथे पाकचे हे दोन्ही दुतावास एका दुकानातून चॉकलेट्स आणि टोपी चोरताना सीसीटिव्हीमध्ये पकडले गेले. या दोन्ही घटना वेगवेगळ्या दिवशी घडल्या आहेत.
कोरिया टाईम्सच्यावृत्तानुसार, पाकच्या एका दुतावासावर 10 जानेवारी रोजी 1,900 वॉन (अंदाजे 1.70 डॉलर) ची चॅकलेट चोरल्याचा आरोप आहे, तर दुसऱयावर 23 फेब्रुवारीला 1,100 वॉन (सुमारे 10 डॉलर्स)ची टोपी चोरी केल्याचा आरोप आहे. टोपी चोरी झाल्यानंतर स्टोअर कर्मचाऱ्याने अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी स्टोअरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही आरोपींची ओळख पटली. हे दोन्ही चोर पाकिस्तानचे दूतावास असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दोन्ही दूतावासांविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.









