वृत्तसंस्था/ कराची
या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये होणाऱया विंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी गुरुवारी पाक निवड समितीने शोएम मलिक व सर्फराज अहमद या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. माजी कर्णधार शोएब मलिक आणि सर्फराज अहमद यांना या आगामी मालिकांसाठी वगळले आहे. बाबर आझमकडे वनडे आणि टी-20 संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
उभय संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळविले जातील. 13, 14 आणि 16 डिसेंबरला तीन टी-20 सामने तर 18, 20 आणि 22 डिसेंबरला तीन वनडे सामने होणार आहेत. हे सर्व सामने कराचीमध्ये खेळविले जातील.
पाक टी-20 संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असीफ अली, फक्र झमान, हैदरअली, हॅरीस रॉफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शहा, मोहम्मद हेस्नेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वासीम ज्युनि., शाहीन आफ्रिदी, शहनवाज देहानी आणि उस्मान कादीर.
पाक वनडे संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असीफ अली, फक्र झमान, हैदरअली, हॅरिस रॉफ, इफ्तिकार अहमद, इमाम उल हक, खुशदिल शहा, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वासीम ज्युनि., मोहम्मद हेस्नेन, सौद शकील, शाहीन आफ्रिदी, शहनवाज देहानी, उस्मान कादीर. राखीव- अब्दुल्ला शफीक.









