अमेरिकेकडून गंभीर आरोप
इस्लामाबाद : पाकिस्तानात अल्पसंख्याकांची स्थिती अत्यंत बिकट होत चालली असून या पापात चीनही भागीदार आहे. पाकिस्तान हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची चीनमध्ये दासीच्या स्वरुपात विक्री करत असल्याचा आरोप अमेरिकेचे मुत्सद्दी सॅम्युअल ब्राउनबॅक यांनी केला आहे. ते अमेरिकेच्या प्रशासनात धार्मिक स्वातंत्र्य विभागात कार्यरत आहेत.
सॅम्युअल यांनी पाकिस्तानसंबंधी धक्कादायक खुलासे केले आहेत. अल्पसंख्याक समुदायाच्या महिलांना चिनी नागरिकांशी विवाह करण्यास भाग पाडले जाते. चीनमध्ये दासीच्या स्वरुपात त्यांची विक्री केली जाते. या महिलांना कुठलेच पाठबळ नसल्याने आणि पाकिस्तानात अल्पसंख्याकांसोबत घृणास्पद भेदभाव होत असल्याने हे घडते असे त्यांनी म्हटले आहे.









