बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील कित्येक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्यासाठी पीडित झालेल्यांसाठी मदत आणि बचावकार्य सुरू करण्याची विनंती केली.
एका ट्वीटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, “या पूर परिस्थिती दरम्यान लोकांवरचा ओझे कमी करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत. त्यांनी निवाराघरांची व्यवस्था करावी आणि नागरिकांचे धोकादायक भागातून स्थलांत करावे. अशी मागणी केली आहे. पुढे त्यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना हे काम तातडीने मंत्री व अधिकाऱ्यांना वितरित करण्याचे आवाहन केले.
सिद्धरामय्या यांनी गेल्या ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात पूरग्रस्तांनी पीडित झालेल्या लोकांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरले. आम्ही वारंवार निषेध करूनही शासनाने कर्णबधिर व्हावे. परंतु निरपराध लोक त्याची किंमत मोजत आहेत. अशी टीका केली आहे.









