बिजवडीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एकजण गंभीर जखमी
प्रतिनिधी/ दहिवडी
बिजवडी (ता.माण) येथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन पांगरी (ता.माण) येथील उपसरंपच रामचंद्र तात्याबा दडस (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहेत.
बिजवडी येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बिजवडी येथे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात पांगरी येथील रामचंद्र तात्याबा दडस यांचा जागीच मृत्यू झाला तर अजय शिंदे (रा.मुरूम ता.बारामती) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी फलटण येथे हलवण्यात आले आहे. सदर घटनेचा पंचनामा दहिवडी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱयांनी केला असून अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करत आहेत.









