ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबान्यांच्या दहशतीला घाबरुन अफगाणिस्तानातील अनेक नेते देश सोडून पळाले. मात्र, अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला राज्यपाल सलीमा माझारी यांनी तालिबान्यांविरोधात बंदुक हातात घेतली. त्यामुळे तालिबान्यांनी त्यांना बंदी बनवले आहे.
सलीमा या अफगाणिस्तानच्या तीन महिला राज्यपालांपैकी एक आहेत. अफगाणिस्तानातील बाल्ख प्रांतातील चाहर किंत जिल्हा तालिबान्यांच्या ताब्यात जाऊ नये, म्हणून त्यांनी लढा दिला. त्यामुळे तालिबान्यांनी सलीमा यांना बंदी बनवले आहे. सलीमा सध्या कुठे आहेत, याची माहिती अद्याप समोर आली नाही.