प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून असलेल्या प्रचंड उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. परंतु तो हुलकावणी देवून जात होता. अखेर रविवारी दुपारी पावसाने शहर परिसराला झोडपले. केवळ एकच तास पाऊस झाला. पण अक्षरश: दाणादाण उडवून गेला. बेळगावमध्ये दाखल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
बेळगावमध्ये रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी 1 नंतर काळय़ा ढगांनी आभाळ भरून आले. यामुळे दुपारी सर्वत्र काहीसे अंधारमय वातावरण तयार झाले होते. लागलीच मेघगर्जनेसह सुमारे तासभर मान्सूनपूर्व पाऊस शहरभर बसरला. काही भागामध्ये गारांसह पाऊस झाला. धो-धो कोसळलेल्या या पावसाच्या पाण्यामुळे गटारी भरून रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. ते पाणी थेट दुकाने व घरांमध्ये शिरले. यामुळे पुन्हा एकदा मागील वषीच्या महापूराची आठवण झाली. तासभरच्या पावसाने घरांमध्ये पाणी शिरल्याने मनपाच्या नालेसफाई मोहिमेचे पितळ उघडे पडले.
शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले. मारूती गल्ली कॉर्नर, ताशिलदार गल्ली, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली, भेंडी बाजार, महात्मा फुले रोड, गोवावेस, जिजामाता चौक, एसपीएम रोड, शास्त्रीनगर आदी परिसरात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याचे प्रमाण वाढल्याने दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. मागील वषी पुराचा फटका बसूनही यावषी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत हे या पावसाने सिद्ध केले आहे.
ताशिलदार- मारुती गल्लीत गुडघाभर पाणी
अचानक धो धो बरसलेल्या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी केले. नरगुंदकर भावे चौकात पाणी साचले होते. त्यामुळे विपेत्यांना दुकाने बंद करण्याची वेळ आली. जालगार गल्ली -शेट्टी गल्ली येथे गटारी भरून रस्त्यांवरून पाणी वाहत होते. तर ताशिलदार गल्ली येथे गुडघाभर पाणी रस्त्यावर आले होते. ताशिलदार गल्लीत गटारीचे पाणी विहिरींमध्ये शिरल्याने पाणी दूषित झाले आहे.
पांगुळ गल्ली-भेंडीबाजारात दुकानांमध्ये पाणी
जालगार गल्ली, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली येथील गटारींचे पाणी ओव्हर फ्लो होवून पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, भोवी गल्ली, कलमठ रोड परिसरात आले. पाणी जाण्यास वाट उपलब्ध नसल्याने रस्त्यावर पाणी साचले. पाण्याचे प्रमाण वाढल्याने थेट दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे शिरलेले पाणी काढण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. या पावसामुळे साहित्य भिजल्याने व्यापाऱयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आधीच कोरोनामुळे दोन महिन्यांपासून व्यापार नाही आणि त्यात पावसाच्या पाण्याने साहित्य भिजल्याने नुकसान कसे भरून काढायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
शहापूरमध्ये रस्त्यावर पाणी
शहापूरमध्येही डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गटारी खोदण्यात आल्या आहेत. पाणी जाण्यास वाट उपलब्ध नसल्यामुळे बँक ऑफ इंडिया कॉर्नरजवळ पाणी साचल्याने डबक्मयाचे स्वरूप तयार झाले होते. महात्मा फुले रोडवर रस्त्यावरच पाणी साचले होते. तर शिवसृष्टीसमोरील रस्त्यावर पाण्याचे डबके तयार झाले होते. शिवाजी गार्डनजवळून जाणाऱया नाल्याच्या पाण्यातही वाढ झाली होती. त्यामुळे शास्त्राrनगर भागाला पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिक चिंतातूर झाले होते. शास्त्राrनगरमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.









