-48 तासात पंचगंगा पात्राबाहेर, धरण क्षेत्रात अतिवृष्टी
-राधानगरीतून विसर्ग सुरु, 58 बंधारे पाण्याखाली
प्रतिनिधी/कोल्हापूर
गत दोन दिवसांत धरणक्षेत्रात झालेली अतिवृष्टी आणि शहरासह जिल्हÎात झालेल्या धुवाधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जूनमधील पहिल्याच पावसात पंचगंगा नदीला पूर आला आहे. गत 48 तासात झालेल्या पावसामुळे यंदा प्रथमच पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे. तसेच कोल्हापूर ते गारगोटी मार्ग बंद झाला आहे.
जिल्हÎामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गत 24 तासात धरणक्षेत्रात सरसरी 200 मि. मी. पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने पंचगंगा नदीची पातळी झपाटÎाने वाढत आहे. यामध्ये बुधवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. धरणक्षेत्रात गत दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तसेच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे निम्मी भरलेली आहेत. महापुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग सुरू केला आहे. यामुळे केवळ दोन दिवसाच्या पावसामध्येच पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे.
पात्राबाहेर पडलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी
पंचगंगा नदी पात्राबाहेर पडल्याने पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोना असतानाही विनाकारण फिरत असल्यावरून यावेळी पोलिसांनी नागरिकांना येथून हटवले.
गगनबावडÎात सर्वाधिक 182.7 मि. मी. पाऊस
जिह्यात बुधवारी दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 182.7 मि. मी. पाऊस झाला. जिह्यात गुरुवारी सकाळी 104 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये हातकणंगले- 89.5 मि. मी., शिरोळ- 73.2 मि. मी., पन्हाळा- 115.1 मि. मी., शाहूवाडी-127.3 मि. मी., राधानगरी- 119.2 मि. मी., गगनबावडा-182.7 मि. मी., करवीर- 97 मि. मी., कागल- 110.1 मि. मी., गडहिंग्लज- 100.7, भुदरगड- 97, आजरा- 85.7 मि. मी., चंदगड- 113.1 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.
राधानगरी धरणातून विसर्ग सुरू
राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. गुरुवारी सकाळी 7 पासून राधानगरी धरणातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी झपाटÎाने वाढत आहे.
पाण्याखाली गेलेले बंधारे
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे व हळदी, तुळशी नदीवरील घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड, दुधगंगा नदीवरील सुळकूड व बाचणी, कासारी नदीवरील यवलूज, कुंभी नदीवरील सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, घटप्रभा नदीवरील कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली.
धरणातील पाणीसाठा
तुळशी 48.84 दलघमी, वारणा 428.20, दूधगंगा 232.45, कासारी 25.74, कडवी 27.39, कुंभी 33.06, पाटगाव 47.34, चिकोत्रा 19.27, चित्री 23.99, जंगमहट्टी 9.95, घटप्रभा 44.17, जांबरे 19.08, आंबेआहोळ 2.61, कोदे (ल.पा) 2.50.
प्रमुख रस्ते बंद
-कोल्हापूर -गारगोटी
-बिद्री -सोनाली-दत्तवडे
-नवले-देवकांडगाव-ताळगाव
-नूल-नंदनवाड
-जरळी-दुंडगे
दिवसात 18 फुटाने पातळीत वाढ
धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत एका दिवसात तब्बल 18 फुटाने वाढ झाली. रात्री आठ वाजता एकूण पातळी 31 फूट 1 इंच इतकी झाली होती.
पंचगंगेची स्थिती
सध्याची पाण्याची पातळी -31 फूट 1 इंच
इशारा पातळी -39 फूट
धोका पातळी-43 फूट
आजपासून जोर ओसरणार
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे दोन दिवस जिल्हÎात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.









