देवस्थान समितीला मिळाले 30 हजारांचे उत्पन्न, 12 हजार साड्या उपलब्ध
प्रतिनिधी / कोल्हापूर
भाविकांनी श्रद्धेपोटी करवीर निवासिनी अंबाबाईला अर्पण केलेल्या साड्याच्या विक्रीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने शनिवारी प्रारंभ केला. गौराईच्या आगमनाचे औचित्य साधून सुरु केलेल्या साडी विक्रीला शहर व परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 147 सहा आणि नऊ वारी साड्याची विक्री झाल्याने समितीला 29 हजार 712 रूपयांचे उत्पन्न मिळाले. टेंबलाई टेकडी, टेंबलाई मंदिराजवळील देवस्थान समितीच्या हॉलमध्ये विक्री सुरु आहे. सकाळ 8 ते 11 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 अशी साडÎच्या खरेदी-विक्रीची वेळ आहे.
गेल्या काही वर्षात देशभरातील हजारो भाविकांनी अंबाबाईला साड्या अर्पण केल्या आहेत. देवस्थान समितीकडे जमा झालेल्या या साड्यापैकी बऱयाच साड्या बाद झाल्या. शिल्लक साड्या बाद होऊ नयेत. तसेच महिला भाविकांना देवीची साडी नेसल्याचा आनंद मिळावा या भावनेने समितीने साड्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानसार शनिवारी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत धर्मादाय उपायुक्त चौधरी यांच्या हस्ते भाविकांना कुपन वाटप केले. तसेच सहायक धर्मादाय रुपाली कोरे यांच्या हस्ते साडी विक्रीला प्रारंभ केला. दोन टप्प्यात सुरु राहिलेल्या व्यवहारातून
147 साड्याची भाविकांनी खरेदी केली
सध्या समितीकडे तब्बल 12 हजारावर साड्या आहेत. यामध्ये पाच हजारांहून अधिक साड्या अडीचशे रुपयांच्या आहेत. उर्वरीत साड्या मात्र किंमती आहेत. या साड्याच्या किंमतीपेक्षा 60 टक्के कमी दराने साड्याची खरेदी भाविकांना करता येणार आहे. साड्या खरेदी करु इच्छिणाऱया भाविकांनी आधारकार्डच्या झेरॉक्स प्रतीसह (आपल्या मोबाईल क्रमांकासह) टेंबलाई मंदिराजवळील देवस्थान समितीच्या हॉलशी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.