महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
परीक्षिता, ते युद्ध इतके अद्?भूत आणि घनघोर झाले की, ते पाहून अंगावर रोमांच उठत. भगवान श्रीकृष्णांशी शंकरांचे आणि प्रद्युम्नाशी कार्तिकेयाचे युद्ध झाले. बलरामांशी कुंभांडाचे आणि कूपकर्णाचे युद्ध झाले. बाणासुराच्या पुत्राला सांब आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भिडले.
हरिहरांचें दारुण युद्ध । परंतु धर्मासि जें अविरुद्ध । तें पहावया निर्जरवृंद । आला विशद तो ऐका । हंसविमानीं चतुर्मुख । आदिकरूनि सनकादिक । ब्रह्मनि÷ नारदप्रमुख । आले कौतुक पहावया । देवयानीं पुरंदर । सवें वेष्टित अमरभार। पहावया हरिहरसमर । आले सत्वर बाणपुरा । द्वादश आदित्यांचा गण । विश्वेदेव सिद्ध चारण । वसु साध्य सुपर्वाण । आले मुनिजन तपोनिधि । मुख्य सप्त महर्षिप्रवर । अपर अठय़ायशीं सहस्र । विमानयानीं ऋषींचा भार । पातले समग्र बाणपुरा।
तैसेचि समस्त लोकपाळ । यक्ष गंधर्व अप्सरामेळ। हरिहराचें युद्ध तुमुल । आले केवळ विलोकना ।
ब्रह्मदेव इत्यादी श्रे÷ देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा आणि यक्ष विमानात बसून हरिहरांचे ते विलक्षण युद्ध पाहण्यासाठी आले.
शङ्कराचे जे अनुचर । निकटवर्ती प्रतापी शूर। तिहीं त्रासिले यादवभार । भिडती क्रूर प्रतापें । भूतें परसोनि मोकळीं भिसें । वीरां झोंबती अट्टहासें। संचार करूनि लाविती पिसें । मग त्यां नुमजे आपपर ।प्रमथ क्रूर कुठारपाणि । एक त्रिशूळें खेंचिती रणीं । एक खट्वाङ्गें फोडिती मूर्ध्नी। एक ते दशनीं विदारिती । एक नखें फाडिती पोटें। एक नयनीं रोविती बोटें । मारूं जातां न दिसती कोठें । पिशाच कपटें भांडती । शाकिनी डाकिनी यातुधानी । नग्न धांवती समराङ्गणीं। उन्मत्त नाचती रुधिरपानी। पिशिताशनी भयंकरा। महामारिका कोटरा ज्ये÷ा । करिती भयंकर कुत्सित चेष्टा । संचार करूनि देती कष्टा । बळें अनिष्टा भेटविती । वेताळ कंकाळ पिंगाक्ष पिंग। उन्मत्त महिषासुर मातंग । समरांगणीं करिती धिंग। कुष्म्णा्डवर्ग भ्रान्तकिर। प्रचंड विघ्न विनायक । परम अघोर प्रेतनायक । ब्रह्मराक्षस क्रव्यादप्रमुख। वीरां सम्मुख घोळसिती। नरगजाश्वी संचार करिती। त्यांची हारपे समरस्मृति। अस्ताव्यस्त धांवताती । बळें मारिती निज सैन्या।आपुले आपणांमाजी वीर। एकमेकां मारिती प्रहार। आंगीं भूतांचा संचार। तेणें आपपर विसरले।हाहाकार समरांगणीं । यादव त्रासिले पिशाचगणीं । हें देखोनि शार्ङ्गपाणि । अमोघ बाणीं वृष्टि करी।शार्ङनिर्मुक्त सुटतां शर । रणीं खेंचले पिशाचभार । भूतप्रेतप्रमथनिकर । पळती समर साडूनी। शाकिनीडाकिनी गुह्यकांतें। शार्ङ्गनिर्मुक्त बाणघातें । त्रासितां पळती गगनपथें । फिरूनि मागुते न पाहती । यातुधानी रुधिराशना । वेताळ कंकाळ पिंगाक्षगणा । लागतां शार्ङ्गनिर्मुक्त बाणा । पळती प्राणा घेऊनी । विनायक जे विघ्नपति । ब्रह्मराक्षस कुष्माण्डजाति। मातरा कोटरा ज्ये÷ा रेवती । पळती दिगंतीं प्राणभयें ।
Ad. देवदत्त परुळेकर








