ऑनलाईन टीम / ठाणे :
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पश्चिम येथे इमारतीचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना आज सकाळी 5.30 च्या सुमारास झाली आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही अशी पालिका प्रशासनाची माहिती आहे.
दरम्यान, काल रात्री मुलुंड पश्चिम येथे देखील पावसामुळे एक भिंत कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये एकाचा मृ्त्यू झाला आहे. दिलीप वर्मा (वय 35) असे अंगावर भिंत कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.








