ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी राज्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. यासोबतच आम्ही राज्यातील 1.4 कोटी नागरिकांना निःशुल्क लसीकरण केले आहेे.
पुढे त्या म्हणाल्या, अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी केले आहे. पण आम्ही राज्यात काही निर्बंध लागू केले आणि कोरोनावर मात केली आहे. निर्बंधाच्या आम्हाला राज्यातील नागरिकांनी सहकार्य केल्याने आम्हाला ही सफलता मिळाली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
- हॉटेल सायं. 5 ते रात्री 8 या काळात सुरू राहतील
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण केल्यानंतर आता राज्यातील हॉटेल सायंकाळी 5 ते रात्री 8 या कालावधीत सुरू असणार आहेत.
- ‘यांचे’ लसीकरण राज्य सरकारकडून
ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यातील प्रमुख मंदिरातील पुजाऱ्यांचे लसीकरण राज्य सरकारद्वारे केले जाणार आहे.