कोलकाता :
निवडणूक आयोगाने मंगळवारी आयपीएस संजय मुखर्जी यांना पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केले आहे. आयोगाने सोमवारी राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि 6 राज्यांच्या गृहसचिवांना पदावरून हटविले होते. यानंतर आयोगाने राज्य सरकारकडून तीन नावं मागितली होती. राज्य सरकारने विवेक सहाय, संजय मुखर्जी आणि राजेश कुमार यांचे नाव सुचविले होते. संजय मुखर्जी हे 1980 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत.









