ऑनलाईन टीम / आसनसोल :
पश्चिम बंगालमधील पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील आसनसोलमध्ये दारूच्या दुकानात एका व्यक्तीने चार जणांना दांड्यानी मारून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी मानसिकरित्या अस्वस्थ होता. पिडीतांमधील तीन जण हे आसनसोल मधील शिवपूर भागात असलेल्या दारूच्या दुकानात झोपले होते. त्यावेळी संबंधित आरोपीने अचानक येऊन यांच्यावर दांड्याने वार केला. त्यानंतर पीडितांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जमा झाले.
त्यानंतर जमा झालेल्या लोकांनी जवळील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. संबंधित आरोपीने बाहेर एका व्यक्तीवर देखील वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारही नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपदचारा दरम्यान चारही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.









