दाट धुक्यामुळे अपघात वाहनाची दगडवाहू ट्रकला धडक
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये दाट धुक्मयामुळे घडलेल्या भीषण रस्ता अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत विवाह समारंभ आटोपून परतणाऱया वऱहाडींवर काळाचा घाला घातला आहे. वऱहाडींना घेऊन जाणारे वाहन दगडवाहू ट्रकवर आदळल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या अपघातातील मृतांमध्ये चार अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील जलपाईगुडी जिह्यातील धुपगुडी येथे ही घटना घडली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना त्यांनी प्रत्येकी अडीच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार आणि अन्य जखमींच्या उपचारासाठी 25 हजार रुपये मदत दिली आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरु असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पाहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुके पाहायला मिळत आहे. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाट धुक्मयामुळे येथे जलपाईगुडी जिह्यात मंगळवारी रात्री भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात 14 जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









