कोलकत्ता / ऑनलाईन टीम
राजकीय अजेंडा समोर ठेवत अनेक राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या जातात. याच घोषणा प्रचार मोहिमेच्या टॅगलाईन बनतात. याच जोरावर प्रतिस्पर्धी पक्षाला कमी आणि मोजक्या शब्दात शह देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात असतो. याद्ववारे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि विरोधकावर हल्ला चढवणे हेच उद्दिष्ट असते. पश्चिम बंगालच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी ही याचा पुरेपूर अवलंब केला. या निवडणुकी दरम्यान सगळ्यात जास्त कशाची चर्चा झाली असले तर ममता बॅनर्जी यांच्या ‘खेलो होबे’ या घोषणेची. विशेष म्हणजे आता बंगालमध्ये चक्क ‘खेलो होबे’ हा दिवस सादरा करण्यात येणार आहे. खुद बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुर्ण बहुमत मिळवत ममता बॅनर्जी तीसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या आणि याचं प्रचारादरम्यान ‘खेलो होबे’ ही घोषणा केली होती. याचा अर्थ होतो खेळ होणार. ही घोषणा लोकांनी स्वीकारली आणि भाजपचा खेळ संपला. यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा थेट विधानसभेत केली.
पश्चिम बंगालच्या निवडणुकी दरम्यान तृणमूल काँग्रेसची टॅगलाईन बनलेल्या ‘खेलो होबे’ या घोषणेचा ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचारसभेत अवलंब करत विरोधकांवर हल्ला चढवला होता. विशेषत: ममता बॅनर्जी निवडणुकीच्या सभांमध्ये वारंवार हा नारा दिला होता. त्यांचे लक्ष्य थेट भाजप होते. या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण होण्यास मदत झाली होती. तसेच भाजपने ही वेगवेळ्या निवडणुकांमध्ये आपल्या प्रचारसभेत ‘मोदी है तो मुमकिन है’, ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशा टॅगलाईनचा प्रचार मोहीमेत समावेश केला आहे.