राजीव बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमध्ये परतले
वृत्तसंस्था / अगरतळा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पश्चिम बंगालमधील भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्रिपुरामधील एका जाहीर सभेत तृणमूलचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी हे पक्षांतर केले आहे.
याच वर्षी ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्रिपद सोडून राजीव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजीव यांनी रविवारी तृणमूलमध्ये पुन्हा प्रवेश करत घरवापसी केली आहे. यापूर्वी काही आमदार आणि खासदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या मोठय़ा विजयानंतर राजीव यांचे सूर बदलले होते. त्यांनी उघडपणे भाजपच्या धोरणांना विरोध करण्यास प्रारंभ केला होता.