ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असतानाच अनेक ठिकाणी वादाचे, मारहाणीचे प्रसंग वारंवार घडत आहेत. यातच आज बॉम्बहल्ल्या सारखी घटना घडली आहे. या बॉम्बहल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामधील दोघांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून हा बॉम्बहल्ला करण्यात आला.
जखमी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजपा नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला होता, ज्यामध्ये त्यांचे सहा कार्यकर्ते जखमी झाले असा दावा केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









