ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 1435 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 24 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्या 31 हजार 448 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,359 नमुने घेण्यात आले. त्यातील 1435 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर कालच्या दिवशी 632 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 19 हजार 213 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 956 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यात 11,289 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात 28 हजार 430 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 4 हजार 512 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









