पेडणे / प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात गोव्यात अडकलेल्या 160 पश्चिम बंगालच्या कामगार बुधवारी 27 रोजी पत्रादेवी चेक पोस्ट जवळ वाहनांसाठी थांबले होते . महाराष्ट्रातून बस वाहतूक सेवा त्यांना घेऊन जाणार आहे त्यासाठी हे सर्व कामगार पत्रादेवी नाक्मयावर जमा झाले होते .
सविस्तर माहिती नुसार राज्यातील विविध भागांतील 160 पश्चिम बंगालच्या कामगार अडकून पडले होते .ते आपल्या गावी जाण्यासाठी 27 रोजी पत्रादेवी नाक्मयावर जमा झाले होते . त्यांना नेण्यासाठी महाराष्ट्र येथून वाहतूक सेवा सुरू झाली आहे ,पत्रादेवी चेक नाक्मयावर 160 कामगार जमा झाले होते . राज्यातून जाण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली असून महाराष्ट्र राज्यातून बांदा पत्रादेवी येथे बस त्यांना नेण्यासाठी येणार आहे .तश्या प्रकारची परवानगी दोन्ही बाजूने त्यांना मिळालेली आहे .
पश्चिम बंगालचे 160 कामगार राज्यात अडकून पडले होते त्यांना आपल्या गावी जाण्याचे वेध लागले होते त्या कामगारांनी त्या त्या तालुक्मयात मामलेदार कार्यालयात नोंदणी केली होती .
त्यानुसार 27 रोजी हे सर्व कामगार पत्रादेवी येथे जमा झाले .त्यांना त्यांच्या राज्यात पोचवण्यासाठी बस वाहतूक सेवा महाराष्ट्र येथून सुरू होणार आहे त्यानुसार हे कामगार पत्रादेवी चेक नाक्मयावर जमा झाले व त्यांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी पुढील प्रक्रिया करण्यात आली .
नईबाग पोरस्कडे येथील 50 मजुर एकत्रित
पोरसकडे न्हयबाग येथे जमा होऊन आम्ही आमच्या गावाला मिळेल त्या मार्गाने पायी जाणार म्हणून जमा झाले होते .
पत्रादेवी चेक नाक्मयावरून कुणालाही परवानगी नसताना परराज्यात जाता येणार नाही ,मात्र काही कामगार चोरवाटातून जाण्याच्या तयारीत असतात ,27 रोजी असेच 50 कामगार जमा होऊन जाण्याच्या तयारीत असताना त्यांना नाक्मयावरून जायला परवानगी मिळत नव्हती म्हणून 50 कामगार परत तोरसे येथू परत पोरस्कडे येथे चालत आले .









