वार्ताहर/ उचगाव
पश्चिम भागामध्ये मराठी बांधवांतर्फे सर्व व्यवहार बंद ठेवून 1 नोव्हेंबरला काळा दिनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला जातो. त्याच पद्धतीने यंदाही काळा दिन पाळण्यात आला.
सीमाप्रश्न सोडवणूक, निराधार, जिद्द महाराष्ट्रात जाण्याचे दाखवून दिले आहे. आता पुन्हा युवा वर्ग अन्यायाविरुद्ध पेटून उठला आहे. तो गप्प बसणार नाही, असा इशाराही पश्चिम भागातील युव वर्गाने सरकारला दिला आहे.
रविवारी उचगाव बस स्थानकावरील व्यापाऱयांनी आपला दुकानदार, उपहारगृह या सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून काळय़ा दिनाला पाठिंबा व्यक्त केला. तसेच या भागातील अतिवाड, बसुर्ते, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, कुद्रेमनी, सुळगा, कल्लेहोळ, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी या भागातील व्यवहार काही भागात बंद तर काही भागात सकाळी बंद, दुपारी, सायंकाळी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.









