सोलापूर / ऑनलाईन टीम
सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, असे म्हणणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लोकगायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून टोला हाणला. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’ असा इशारा आनंद शिंदेंनी दिला. मित्र भारत भालके यांच्या प्रेमाखातर आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते.
आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.
म्हणाले की, तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.
आनंद शिंदे यांनी हे गाणे वाचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी धुरळा चित्रपटातील ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








