कोल्हापूर प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले “सतत पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणारे शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. आता संजय राऊत यांच्या गळ्याला आल्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचे कारण काय?” “सरकार पाच वर्षे टिकणार आहे. हा मुद्दा आता काढण्याचे कारण काय?” “बाकीच्यावर कारवाई झाली त्यावेळी पवार का नाही भेटले.?* तसेच “मी वारंवार म्हणत होतो की संजय राऊत हे पवारांचे आहेत, हे यावरून सिद्द झाले.” असेही ते म्हणाले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘थेट पाईपलाईनबाबत वारंवार पालकमंत्री यांच्याकडून तारीख दिली जाते. लबाडाच्या घरचे जेवण जेवल्याशिवाय खरे नाही. अशी परिस्थिती पाईपलाईन बाबत झाली आहे. हीच गोष्ट विमानतळाबाबत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने विमानतळचे काम सुरू झाले, त्याच कामाचा एक भाग लँडिंग, धावपट्टी सुरू आहे. पण त्याचे श्रेय घेण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. तसेच आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना शाहूमिल लक्षात आलं. उत्तरच्या पोटनिवडणूकित अडचणीत आले म्हणून त्यांना शाहू मिलची आठवण झाली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
याचबरोबर “केएसबीपी च्या माध्यमातून दुभाजक, चौक, ट्राफिक पार्क आशा चांगल्या गोष्टी झाल्या. मात्र सरकार गेल्यावर त्या थांबवण्याच्या नोटीस महापालीकेतून देण्यास सुरू झाल्या. महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक पत्र दिले, त्यावर असे लिहिले होते की ट्राफिक गार्डन, दुभाजक तुमच्या ताब्यात घ्या. पण त्यावर काही झाले नाही. पण निवडणुकीत आता पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ह्या गोष्टी पालकमंत्र्यांना आठवू लागल्या आहेत.” असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.