पुणे/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari Minister) यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Member of Rajya Sabha) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार आहेत. याआधी गडकरी आणि शरद पवार यांची पुणे विमानतळावर भेट झाली. दोघांमध्ये विकासकामांच्या संदर्भाने जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेते नगरकडे एकाच हेलिकॉप्टरने रवाना झाले.
दरम्यान राज्य तसंच देशाच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची आज पुण्यात भेट झाली. नगर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी हे दोन नेते जात होते यावेळी त्यांनी भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात भेट झाली. यावेळी पुण्यात विविध मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Member of the Lok Sabha) यांनी दिलीय. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना दिल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं.