पलूस / प्रतिनिधी
पलूस तालुक्यामध्ये आज दिवसभरात कोरोना रूग्णांत वाढ झाली असून कुंडल मध्ये ६ रुग्ण, पलूस व वसगडे मध्ये एक एक रूग्ण असे एकूण ८ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिणी पवार यांनी दिली आहे.
आज अखेरपर्यंत पलुस तालुक्यात कोरोना २४७७ बाधीत रूग्णांची संख्या झाली आहे. तर उपचारानंतर २३६२ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ३४ अॅक्टिव रूग्ण असुन होम आयशोलेशन मध्ये ३० रुग्णं आहेत.इतर पलूस ग्रामीण रुग्णालयात ४ रुग्ण उपचार घेत आहेत.
Previous Articleवाहन चालकांनो सावधान
Next Article कलावंतांच्या समस्या दूर करणार – मंत्री यड्रावकर








