पलुस / प्रतिनिधी
पर्यावरण व पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना सांगली जिल्हा विस्तारक किरण सावंत यांच्या नेतृत्वा खाली पेट्रोल, डिझेल,गॅस महागाईविरोधात ३१ ऑक्टोबर रोजी युवासेना सांगली जिल्हा व अवजड वाहतूक सेना पलुस तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल मोर्चा काढण्यात आला.
युवासेना सांगली जिल्हा युवाअधिकारी विनायक गोंदिल यांनी बहोत हो गई महंगाई की मार होश मे आओ मोदी सरकार म्हणत सायकल मोर्चाचे नेतृत्व केले. मोठ्या प्रमाणात युवक व युवती उस्पूर्तपणे सायकल मोर्चात सहभागी झाले होते. मोदी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून निषेध नोंदवायण्यात आला.
विनायक गोंदिल यांनी मा.मोदींनी दिलेली आश्वासने फोल ठरल्यामुळे सामान्य जनतेचे ऐन दिवाळी सणाच्या वेळी दिवाळ निघालं आहे. असे मत व्यक्त केले. मोर्चाला जेष्ठ शिवसैनिक राजू सोनवणे, यांच्यासह आदी मान्यवर तसेच युवासैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.









