पलुस/प्रतिनिधी
पलुस तालुक्यातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयावर मंगळवार, १४ रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
महापूर येवून दीड महिना होऊन गेला तरी देखील शासनाकडून पूरबाधित विस्थापित कुटुंबाना सानुग्रह अनुदान धान्य, व्यापाऱ्यांना मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी नुकसान भरपाई अनुदान, घर पडझड अनुदान, जनावरांच्या गोठ्यांचे अनुदान, पुरामध्ये वाहून गेलेल्या गाई, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, पोल्ट्रीधारक यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. पूरग्रस्तांनी भाजप जनसंपर्क कार्यालयाजवळ सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. मोर्चा अकरा वाजता जुन्या बसस्थानक येथून निघणार आहे.