प्रतिनिधी/ म्हापसा
पर्वरी तिस्क येथे राहणाऱया नारायण सातार्डेकर यांच्या घराला आग लागून या आगीत सुमारे 5 लाखाच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आमदार रोहन खंवटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आग विझविण्यासाठी पीळर्ण व म्हापसा अग्निशमन दलाच्या बंबच्या वापर करण्यात आला. या आगीत फ्रीज, भांडी, पॅन, कपडे, वातानुकुलीत संच, टिव्ही संच, फर्निचर आदी पूर्णपणे जळून खाक झाले. सदर आग दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान लागली. आग विझविण्यास म्हापशाचे जवान सुरज शेटगांवकर, स्वप्नेश कळंगुटकर, विष्णू नाईक, भगवान पाळणी, नितीन मयेकर, पीळर्णचे दामोदर पेडणेकर, श्यामसुंदर पाटील, जितेंद्र बाळी, रुद्रेश पांढरे, भावेश शिरोडकर यांनी ही आग विझविली.








