सर्वत्र कचऱयाचे ढीग : ईमारत मोडकळीस
विषेश प्रतिनिधी / पर्वरी
पर्वरी हे मोठे शहर असल्याने मोठय़ा प्रमाणात या भागात लोकवस्तीही झाली आहे. या भागाचे झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. पर्वरी परिसरात मोठ मोठी सुपरमार्केट मॉल असले तरी पर्वरी भागातील पूर्वीच्या जून्या मार्केटची मात्र दुर्दशा झाली आहे. पूर्वी या मार्केटमध्ये लोक मोटय़ाप्रमाणात खरेदी करायला यायचे पण आता हे मार्केट मोडकळीस आले आहे. तसेच दुर्गधीमुळे अनेक दुकानेही बंद करण्यात आली आहे. जीसीएच्या समोर असलेल्या या मार्केटची स्वच्छत करणे करजेचे आहे. सध्या या मार्केटचे अन्य ठिकाणी बांधकाम सुरु आहे.
मार्केटमध्ये सर्वत्री दुर्गंधी
या मार्केटमध्ये सर्वत्री दुर्गंधी पसरली आहे. मार्केटच्या ईमारतीच्या आजूबाजूला प्लास्टीक पिशव्या, बॉटल्सचा खच साचलेला आहे. पावसामुळे सर्वत्री दुर्गंधी येत आहे. या मार्केटमध्ये दुर्गंधीमुळे ग्राहक पाठ फिरवितात. पूर्वी या मार्केटमध्ये मोटय़ा प्रमाणात गर्दी असायची मर्केटमध्ये सर्व प्रकारची दुकाने होती. आता पर्वरी परिसरात मोठी दुकाने मॉल झाल्यामुळे या मार्केटकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच स्थानिक पंचायतीचे याकडे लक्ष नसल्याने या मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. सर्वत्र पान सुपारी गुटखा खाऊन भिंतीवर थुंकण्यात आले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भिती आहे.
मार्पेंटची ईमारत धोकादायक
या मार्केटची ईमारत खूप वर्षे जुनी आहे. त्यामुळे ही ईमारत मोडकळीस आली आहे. ही ईमारत कौलारु असल्याने अनेक कौले फुटली आहे. तसेच भिंतीवर झाडाची मुळे रुजली आहे. पावसाळय़ात सर्व भिंतीही पाजरल्या आहे. या ईमारतीत असलेले दुकानदार जीव मुठीत घेऊन आहे. ईमारतीच्या छपरातून गळती आहे. ईमारतीचे खूप जुने बांधकाम आहे. त्यामुळे ईमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नवीन मार्केट होण्यास अजून अनेक वर्षे असल्याने या ईमारतीची तात्पूरती डाकडुक्की करावी, असे या मार्केटमधील काही दुकानदारांनी सांगितले.
मार्केटमध्ये मोजकी दुकाने शिल्लक
दुर्गधीमुळे ग्राहकांनी या मार्केटकडे पाठ फिरविली आहे. पर्वरी शहरात आता अनेक मोठ मोठी दालने झाल्याने या मार्केटमध्ये कोणीही येत नाही. याचा परिणाम या मार्केटमधील दुकानदारांना झाला आहे. या मार्केटमधील आता अनेक दुकाने बंद करण्यात आली आहे. या मार्केटमध्ये आता फक्त काही मोजकी किराणा दुकाने चिकन माटणची दुकाने, दारुची दुकाने, भाजीची दुकाने आहे. ईमारतच धोकादायक असल्याने दुकानदारांनी आपल्या दुकानांची शुभाशिकरण केले नाही. अनेक दुकानदारांनी दुकाने बंद करुन ठेवली आहे. पूर्वी या मार्पेटची सर्व दुकाने खुली होती.
बेवारस लोकांचा आश्रय
हे मार्केट सध्या बेवारस लोकांचा आश्रय झाला आहे. रात्रीच्या वेळी बेवडे तसेच परप्रांतीय बेवारस लोक या ठिकाणी दारु पिऊन झोपलेले आढळतात त्यामुळे त्यांच्याकडून दुर्गंधी केली जाते. या मार्केटमध्ये अनेक दारुची दुकाने असल्याने अनेक दारुडे या मार्केटमध्ये दारु पिऊन पडलेले दिसतात. बेवारस जानवारे या ठिकाणी आहे. अनेक बेवारसांनी या मार्केटचा आश्रय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे अस्वच्छता करण्यात आली आहे. या मार्केटमधील शौचालयही दुर्गधमीय झाले आहे. या मार्केटची स्वच्छता करण्याची मागणी दुकानदार तसेच ग्राहकांकडून केली जात आहे.
मार्केटच्या आठवणी अजूनही ताज्या या मार्केटच्या आठवणी अजूनही ताज्या आहे. अनेक जाणकार लोक या मार्केटच्या आठवणी सांगतात पूर्वी फक्त हाऊसिंग बोर्ड कॉलनी, पोलीस वसाहत व पुंडलिक नगर होते. या सर्व वसाहतीतील लोक या मार्केटमध्ये खरेदी करायला याचे. आता पर्वरीत अनेक आधनिक मॉल दुकाने झाल्याने हे मार्केट दुर्लक्षित झाले आहे. पूर्वी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ग्राहक याचे आता दुर्गधीम झाल्याने या ठिकाणी ग्राहक येत नाही असे या मार्केटमधील काही दुकानदारांनी सांगितले.









