बिहारमधील तरूणाचा अनोखा उपक्रम
प्रतिनिधी/ पणजी
’सायकल वापरा, पर्यावरण सांभाळा’ हा संदेश देशवासियांना देण्यासाठी देण्याच्या उद्देशाने भारतभ्रमण करणारा तऊण काल गोव्यात पोहोचला. आपल्या दोन दिवसांच्या वास्तव्यात तो येथील अनेक शाळा, क्लब आणि सर्वसामान्य नागरिकांना भेटून आपला संदेश पोहोचविण्याचे काम करणार आहे.
बिहारच्या सुकून जिह्यातील बिरपूर गावचा (नेपाळ शिमेजवळ) रहिवासी असलेला अजित चौधरी हा तऊण 19 जानेवारी रोजी आपल्या सायकलवरून भारतभ्रमणास निघाला. पदवीधर असलेला सदर तऊण आपल्या गावात छोटेसे दुकान चालवतो. परंतु सध्या ज्या प्रकारे वनांचा संहार आणि पर्यावरणाची हानी होत आहे त्यातून तो अस्वस्थ होत असे. त्यामुळे आपला धंदा भावाच्या हवाली सोपवून थेट सायकल बाहेर काढली व तो प्रवासास निघाला. बिहारमधून बाहेर पडल्यानंतर तो पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र, तामिलनाडू, पुडूचेरी, कर्नाटक, केरला आणि गोवा आदी राज्यांचा सुमारे 5800 किमी प्रवास पूर्ण केला आहे.
येथून पुढे तो महाराष्ट्रमार्गे पुढील राज्यांना भेटी दिल्यानंतर पुन्हा बिहारला पोहोचणार आहे. त्या दरम्यान बारा ज्योतीर्लिंग आणि चारधामलाही तो भेट देणार आहे. या प्रवासादरम्यान खानपान, कपडे, आदी खर्चाची व्यवस्था कशी होते, असे विचारले असता, आतापर्यंत अनेकांनी मदत केली आहे. तरीही गरज पडली तर घरची मंडळी मोबाईलच्या माध्यमातून पैसे पाठवतात. अशा प्रकारे आतापर्यंत सुमारे 20 हजार ऊपये खर्च केले असल्याचे त्याने सांगितले.









