प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानाचाच एक भाग म्हणून शहरातील नागरिकांनी झाडे लावावीत म्हणून आरोग्य विभागाने आपल्या घराच्या परिसरात असलेल्या झाडांसोबतचा फोटो पाठवा, असे आवाहन केले आहे. त्या झाडांचे नाव व त्याची वैज्ञानिक माहिती पाठवा, पालिकेच्या सोशल साईटवर प्रसिद्ध करु असे म्हटले आहे.
वास्तविक पालिकेच्या आरोग्य विभागाचा आणि वृक्ष विभागाचा समन्वय नाही. त्यातच आरोग्य विभागाकडून माझी वसुंधरा अभियानातंर्गतच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा नेहमी प्रयत्न राहत आलेला आहे. त्याचाच भाग म्हणून झाडे लावण्यासाठी नागरिकांमध्ये प्रोत्साहन निर्माण व्हावे यासाठी आता नवीन एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यात सातारकरांनीं आपल्या घरी झाडे लावली आहेत काय आपण आपल्या घरी झाडे लावली असतील तर त्यांचा सोबत सेल्फी काढून पालिकेच्या मेल आयडीवर पाठवा, किमान एका झाडाचे नाव व त्यांचे वैज्ञानिक नाव पाठवा, त्यांची पालिकेच्या समाजिक माध्यत्मातून प्रसिद्धी करण्यात येईल, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.








