पर्यटन वाढीला चालना देत परिसराचा साधणार विकास
वार्ताहर/कास
जागतीक वारसास्थळ कास पुष्प पठार, बामणोली, तापोळा, परळी ठोसेघर परिसराचा पर्यटनातून विकास साधण्यासाठी माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पठारविभागातील काही कार्यकर्त्यानी राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची घेवून निवेदन दिले व अडचणी सदंर्भात सविस्तर चर्चा केली. यानंतर ठाकरे हे दिवाळी नंतर या निसर्गरम्य परिसरात दौरा करून पर्यटन विकासला चालना देत येथील अडचणी सोडवण्यावर भर देणार असल्याची माहिती कार्यकर्त्यानी दिली.
कास बामणोली परळी तापोळा ठोसेघर हा परिसर विविधरंगी निसर्ग संपदेने नटलेला असून या भागात बारमाही पर्यटन चालण्यासाठी मोठा वाव आहे. स्थानिकांचा विकास साधण्यासाठी पर्यटनातून विकास हा एकमेव पर्याय उरला असून पर्यटन वाढीला चालना मिळाल्यास स्थानिकांना गावातच रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी पर्यटन मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीनी अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
माजी आमदार दगडुदादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी काही कार्यकर्त्यानी मुंबई येथे पर्यावरण व पर्यटन मंत्री ठाकरे यांची भेट घेतली. व गावापर्यंत रस्ते सोईसुविधा पर्यटनाच्या अडचणी स्थानिकांना रोजगार वनविभागाच्या अडचणी आदी अनेक विषयांवर चर्चा केली. यानंतर येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व पर्यटनाला चालना देऊन परिसराचा विकास साधण्यासाठी मंत्री ठाकरे हे या भागाचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटी दरम्यान माजी आमदार दगडु दादा सपकाळ, कराड उत्तर संपर्क प्रमुख शंकर सपकाळ, नंदकुमार गोरे, कोंडीबा शिंदे, जितेंद्र सकपाळ, प्रदीप कदम, लक्ष्मण आखाडे, जगन्नाथ माने, नामदेव मोरे, रविंद्र मोरे आदी कार्यकर्तें उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









