भवानी पेठेतल्या गुरुदत्त शेजवळांनी केलाय टेरेसवर रेन वॉटर हार्वेस्टिंग : सहयोग सोसायटीतल्या शिवकुमार काळेंनी घरातच ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती : माझी वसुंधरा अभियानाच्या निमित्ताने सातारा पालिकेकडून शहरात नाविण्यपूर्ण उपक्रम
विशाल कदम / सातारा
शहरात काही नागरिक सतत नाविण्याचा विचार करत असतात. आपल्यापासून दुसऱयाला तोटा होणार नाही. निश्चितच पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल यासाठी कार्यरत असतात. असेच भवानी पेठेतल्या गुरुदत्त शेजवळांनी त्यांच्या शिवनेरी अपार्टमेंटच्या टेरेसवरच रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरु केले. पाण्याच्या बचतीतून पाणी वाचवा हा संदेश त्यांनी दिला आहे. तर पिरवाडीतील सहयोग सोसायटीचे शिवकुमार काळे यांनी घरातच कंपोस्ट खत निर्मिती केली आहे.
नुकतेच सातारा पालिकेत माझी वसुंधरा अभियान सुरु झाले आहे. या अभियानाची कुठेही चर्चा नाही. परंतु पालिकेच्या आरोग्य विभागाने नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सुचनेनुसार आरोग्य विभागाने या अभियानाचे काम सुरु केले आहे. तत्पूर्वीच सातारा शहरात काही नागरिकांनी शहराचे व आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणाचा कसा समतोल राखला जाईल याकरिता स्वतःच घरात नाविण्यपूर्ण प्रयोग सुरु केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच देण्यात आली आहे.
त्यामध्ये पाण्याची बचत करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उप्रकम महत्वाचा ठरतो. भवानी पेठेतल्या शिवनेरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱया गुरुदत्त शेजवळ यांनी टेरेसवर हा प्रकल्प सुरु केला. टेरेसवरचे पाणी शोषखड्डय़ात सोडले. त्यामुळे त्यांच्या अपार्टमेंटच्या कुपनलिकेचे पाणी वाढले आहे. तर पिरवाडी भागातले शिवकुमार काळे यांनी त्यांच्या सहयोग सोसायटीतला ओला कचरा घंटागाडीत न टाकता त्यावर घरीच प्रक्रिया करुन कंपोस्ट खत निर्मिती केली आहे. तयार झालेले खत सोसायटीतल्या बागेतच वापरले जाते. विशेष म्हणजे घंटागाडीत ओला कचराच टाकला जात नाही.
वर्षाला 4 लाख लिटर पाणी वाचले
रेन वॉटर हावसिस्टगिं हार्वेस्टिंग टेरेसवर करण्यात आले आहे. एका टेरेसवरुन दुसऱया टेरेसवरील पाणी पाईपलाईनद्वारे शोष खड्डय़ात सोडले गेले आहे. त्यामुळे बोअर वेलच्या पाण्याची पातळी पाच फुटांनी वाढली आहे. नजिकच्या विहिरीचीही पाणी पातळी वाढली आहे. वर्षाला 4 लाख लिटर पाणी वाचवले. पावसाचा थेंब वाचवला आहे. दर मार्च, मे मध्ये टेरेसची स्वच्छता केली जाते. तसेच दर महिन्याला सोसायटीत सुके प्लास्टिक साठवून ते कंपनीला रिसायकल करायला दिले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी टळते.









