खानापूर / बातमीदार
31 डिसेंबर रोजी किल्ला, पर्यटन स्थळ, सार्वजनिक स्थळावर धुम्रपान करणे, दारू पिणे, फटाका लावणे व पार्टी करणे यावर प्रशासनाने निर्बंध घालावेत अशा मागणीचे निवेदन खानापूर तहसीलदाराना हिंदू जनजागृती समितीच्यावतीने सोमवारी देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, हिंदू जनजागृती समिती देशाचे रक्षण आणि धर्म जागृती करणारी एक सेवाभावी संस्था आहे. समिती सार्वजनिक उत्सव आणि अन्य कार्यक्रमाद्वारे होणारी अनुसूचित घटना म्हणजेच राष्ट्रध्वज, राष्ट्रीय पत्रिका आणि मानचिन्ह यांचा होणारा अनादर रोखण्यासाठी प्रयत्न करते. तसेच फटाके लावल्यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करते. देवदेवतांचा अनादर करणाऱयांना रोखते. 18 वर्ष यासंदर्भात हिंदू जनजागरण समिती जनजागृती करीत आहे. यासाठी प्रशासनाने व पोलिसांनीही चांगली साथ दिली आहे.
मद्यप्राशन-धुम्रपान थांबवा
25 डिसेंबर तसेच 31 डिसेंबरच्या रात्री मोठय़ा प्रमाणात फटाके लावले जातात. धूम्रपान, मद्यप्राशन करुन अती वेगाने वाहने चालवली जातात. याचा परिणाम अनेक दुर्घटना होण्यावर होतो. या दिवशी नवतरुण दारू पिण्यास सुरुवात करतात. त्यात महिलांचाही सहभाग असतो. पूर्ण रात्र फटाके लावून ध्वनी प्रदूषण केले जाते. अश्लील हावभाव करून नाच गायन केले जाते. मुलींची छेडछाड करणे, अत्याचार करणे आधी दुष्कृत्ये केली जातात. त्यामुळे देशाची कायदा व व्यवस्था गंभीर बनत चालली आहे. पोलीस आणि प्रशासनावर अतिरिक्त तणाव पडतो. शिवाय देशाची युवापिढी नैतिकदृष्टय़ा वाईट मार्गाने जात आहे.
यावषी कोरोनाच्या महामारीने सर्वत्र कहर माजविली आहे. काही तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभावना व्यक्त करत आहेत. त्यातच आता फटाके लावल्यामुळे प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणसाचे जीवन धोक्मयात येणार आहे. त्यासाठी या दिवशी सार्वजनिक कार्यक्रमावर प्रतिबंध घालने गरजेचे आहे.
…तर हिंदू जनजागृती समिती सदैव तत्पर
या सर्व बाबींचा विचार करून 31 डिसेंबर रोजी किल्ला, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यप्राशन व पार्टी करणे तसेच फटाके लावण्यावर प्रतिबंध घालावा. एखाद्यावेळी याकामी आवश्यक पडल्यास हिंदू जनजागृती समिती सदैव तत्पर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना हिंदू जनजागरण समितीचे कोनेरी कुम्रतवाडकर, प्रसाद शिंदे, राजू चव्हाण तसेच विश्व हिंदू परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष गोविंदराव किरमटे आदीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.









