राधानगरी पर्यटन सप्ताहास शुभारंभ
राधानगरी/प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राधानगरी तालुका पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यात या परिसरात असुविधा राहणार नाही. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या दूरदृष्टीने पर्यटन वाढीस योग्य दिशा देतील व बायसन नेचर क्लबने निसर्ग पर्यटनाचा आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी केले. ते जागतिक पर्यटन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या संकल्पनेतुन पर्यटन सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी पर्यटन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मीना निंबाळकर होत्या.
यावेळी बोलताना तहसीलदार मीना निंबाळकर यांनी, राधानगरी हे पर्यटन जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र असून अद्याप हा परिसर दुर्लक्षित आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ इंग्रजांच्या काळापासून विकसित झाले आहे. आता मात्र सर्व स्तरावर पर्यटनवाढी साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले, निसर्ग सौदर्याने नटलेला कासारवाडी धबधबा, राऊतवाडी धबधबा, धरण परिसर, फुलपाखरू उद्यान, बँक वॉटर परिसर, काळमावाडी धरण आदी स्थळांना पर्यटकांनी भेट देऊन निसर्ग भ्रमंती केली.
यावेळी सरपंच कविता शेट्टी, नंदकिशोर सूर्यवंशी, वनक्षेत्रपाल अजित माळी, माहिती विभागाचे एकनाथ पोवार, दिपक शेट्टी, रुपेश बोंबाडे यांच्यासह जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील पर्यटक या पर्यटन सप्तहात सहभागी झाले होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









