जेरूसलेम
इस्रायल सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी दोन हजार वर्षे जुन्या हेरोड महालाला पर्यटकांसाठी खुले करण्याची घोषणा केली आहे. हा महाल ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील सर्वात सुंदर संरचना असल्याचे मानले जाते. सरकारने तेथे दुरुस्तीकार्यही सुरू केले आहे. इस्रायलच्या पुरातत्व विभागानुसार हा महाल जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर आहे. या महालाच्या परिसरात आता निसर्ग उद्यान विकसित करण्यात येणार आहे. क्रूरतेसाठी ओळखला जाणारा राजा हेरोडने याची निर्मिती करविली होती.









