प्रतिनिधी/ महाबळेश्वर
सलग सुट्टय़ांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी झाली असून नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना कावरा लागत आहे या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटकांची सायंकाळी नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकसह विविध प्रेक्षणीय स्थळांवर गर्दी होताना दिसत असून मुख्य बाजारपेठेत देखील पर्यटक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.
उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वर व पांचगणी ही पर्यटनस्थळे बहरली असून गत काही दिवस महाबळेश्वर व परिसरात धुक्यात हरवल्याचे चित्र होते या बदललेल्या वातावरणामुळे पर्यटकांना पावसाळ्यातील महाबळेश्वची अनुभूती मिळत आहे शनिवार रविवार या सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे महाबळेश्वर व पांचगणी ही जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण असलेल्या ऑर्थरसीट पॉईंट सह पौराणिक दृष्टय़ा महत्वाचे असलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर,शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेला केट्स पॉईंट तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉईंट येथे सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.महाबळेश्वर पासून जवळ असलेले ऐतिहासिक किल्ले प्रतापगड,शिवकालीन खेडेगाव,मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.महाबळेश्वरच्या सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची रेलचेल आहे प्रामुख्याने येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला तर चौपाटीचे स्वरूप आले असून वेण्णालेक ची पाणीपातळी घटली असली तरी नौकाविहाराचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत या सोबतच गरमागरम मका कणीस,पॅटिस,प्रँकी,पावभाजी,पाणीपुरी,भेळ तर येथील चविष्ट स्ट्रॉबेरी विथ क्रीम,विविध रंगी आईस गोळा सारख्या थंड पदार्थांवर देखील पर्यटन ताव मारताना पाहावयास मिळत आहेत तर अनेक हौशी पर्यटक वेण्णालेक वर घोडे सवारीचा आनंद घेत आहेत येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.
येथील मुख्य बाजारपेठेत देखील पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत असून चणा,चिक्की,जॅम,फज सोबतच प्रसिद्ध चप्पलची खरेदी करताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.रेस्टोरंट देखील सायंकाळी फुल्ल होत आहेत.येथील हॉटेल्स देखील पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
(नेहमी प्रमाणे वेण्णालेक सह प्रमुख ठिकाणी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून तासंतास अडकून पडावे लागत आहे पोलीस प्रशासनाचा नियोजनशून्य कारभाराचा मनस्ताप पर्यटकांसह सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे..