- पेडण्यातील तीनपैकी दोन चेकनाके सताड उघडे
- बहुतांश पर्यटकांना ताटकळत रहावे लागते रांगेत
- चहा, नाश्ता, पाण्याची सोय नसल्याने उपाशी
पेडणे / प्रतिनिधी
नवीन वर्ष गोव्यात साजरे करण्यासाठी येणाऱया देशी पर्यटकांचे लोंढे वाढत असून पत्रादेवी चेकनाक्मयावर प्रचंड गर्दी होत आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, अपुरी यंत्रव्यवस्था असल्याने कोरोना तपासणीचे काम करणाऱया कर्मचाऱयांची दमछाक होत आहे, तर दुसऱया बाजूने पर्यंटकांना दोन ते तीन तास उपाशीपोटी रहावे लागत आहे.
पत्रादेवी चेक नाक्मयावर कमी मनुष्यबळ, कमी पोलीस कर्मचारी असल्याने आणि कोरोना चाचणी करण्याची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने प्रवाशाना या नाक्मयावर दोन ते तीन तास ताटकळत रहावे लागते. पर्यटकांसाठी त्या ठिकाणी सरकारने शौचालय, मुतारी किंवा नाश्ता चहा यांची कोणतीही सोय केलेली नाही. याबाबत नागरिकांनी सरकारी यंञणेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात देशी पर्यटक महाराष्ट्र, कर्नाटक, गुजारात, दिल्ली आदी राज्यातून गोवा राज्यात प्रवेश करत आहेत. हजारोंच्या संख्येने पर्यटक चेकनाक्यावर स्वतःची वाहने किंवा बसने येऊन थडकत आहेत.
सरकारी यंत्रणा तोकडी
सरकारने कोरोनाचे नियम केले ते कुणासाठी, त्याची अंमलबजावणी का होत नाही, ते कागदावरच भक्कम आहे का, त्याची कार्यवाही करताना सरकारी यंत्रणा आणि नागरिकही कमी पडतात, असे मत यावेळी प्रवासी राजाराम कुबडे यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.
तीनपैकी दोन चेकनाके सताड उघडे
पेडणे तालुक्मयात पत्रादेवी, किरणपाणी, नईबाग असे तीन चेकनाके आहेत. त्यापैकी पत्रादेवी याच नाक्मयावर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी आणि कोरोना चाचणी केली जाते, इतर नाक्मयांवर कोणत्याच सुविधा आणि सोयी नाहीत. त्यामुळे ते नाके सताड उघडे असतात. अनेक पर्यटक तिथून कोरोना तपासणी न करता गोव्यात प्रवश करत आहेत. त्यामुळे गोव्यात केरोना संसर्ग वाढण्याचा धोका मोठा आहे.
एकाचवेळी 250 जण रांगेत
पत्रादेवी नाक्मयावर एकाचवेळी 200 ते 250 नागरिक रांगेत उभे असल्याने पोलिसांना यावर नियंत्रण मिळवताना अडचणी येतात, शिवाय कोरोना टेस्ट करणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. एक डोस घेतला तर या ठिकाणी चाचणी करण्यासाठी जी खाजगी आरोग्य केंदे आहेत त्या ठिकाणी 250 रुपये शुल्क आकारले जाते. याही केंद्रात कर्मचाऱयांची उणीव आहे, शिवाय पोलिसांची संख्या कमी असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसाना बरीच कसरत करावी लागते.
प्रवाशी तासंनतास उपाशी
जे पहाटेपासून प्रवासी नाक्मयावर येतात त्यांना या ठिकाणी कसल्याही सोयी सुविधा नाही. शौचालय, मुतारी किंवा चहाचा स्टॉलही त्या ठिकाणी नाही. तासनतास प्रवाशांना उपाशीच राहावे लागते.
अपुऱया कर्मचारीवर्गामुळे अडचण
पत्रादेवी नाक्मयावरून परराज्यातील हजारो पर्यटक लहान मोठी वाहने घेऊन येतात. ते प्रवासी चेकनाक्मयावर आपल्याकडे कोरोना प्रमाणपत्र आहे की नाही यांची नोंद करण्यासाठी गर्दी करतात. त्या ठिकाणी दोन खाजगी आरोग्य केंद्रांकडून कोरोना चाचणी केली जाते, तिथेही अडगळीत स्थितीत आरोग्य कर्मचाऱयांना काम करावे लागते. एका नागरिकाची कोरोना चाचणी करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे खर्ची जात असल्याने गर्दी वाढत आहे. शिवाय मनुष्यबळ कमी असल्याने गर्दीत भर पडत आहे.
पहाटेपासून मोठय़ा बसेसच्या रांगा
पत्रादेवी चेकनाक्मयावर पहाटे साडेपाच सहा वाजल्यापासून प्रवासी बसेस यायला सुरुवात होते, एकामागून एक प्रवासी बसेस येऊन रांगा करतात. आपल्याकडे असलेल्या कोरोना प्रमाणपत्राची तपासणी करतात. एखाद्या प्रवाशाकडे कोरोना दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसल्याने त्याना रांगेत राहून चाचणी करावी लागते. त्याची चाचणी होईपर्यंत इतरांना तेथेच ताटकळत राहावे लागते.









