प्रतिनिधी / खेड
जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची धडधड थांबली असून बहुतांश रेल्वेगाड्या ठिकठिकाणच्या स्थानकात उभ्या करण्यात आल्या आहेत.
वाशिष्ठी नदीला आलेल्या पुलामुळे दादर – सावंतवाडी गुरुवारी पहाटे ६ वाजल्यापासून चिपळूण स्थानकात उभी करण्यात आली आहे. मंगळूर – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला पहाटे ५.१५ वाजल्यापासून कामथे स्थानकात तर जनशताब्दी एक्सप्रेसला खेड स्थानकात थांबा देण्यात आला आहे. एर्नाकुलम – निजामुद्दीम एक्सप्रेस संगमेश्वर स्थानकात, तिरूअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस विलवडे स्थानकात, तिरुनेलवेली – दादर स्पेशल राजापूर स्थानकात, कोच्युवेली – अमृतसर साप्ताहिक स्पेशल रत्नागिरी स्थानकात उभी करण्यात आली आहे. यामुळे शेकडो प्रवाशी रेल्वेगाड्यांमध्ये अडकले असून पूरस्थिती ओसरल्यानंतरच रेल्वेगाड्या मार्गस्थ होणार असल्याचे सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









