प्रतिनिधी/ बेळगाव
नैऋत्य रेल्वेने नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी, नावल ऍकॅडमी व इतर परीक्षांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाववरून यातील 5 रेल्वे जाणार आहेत. मुंबई-मडगाव, कोल्हापूर-मडगाव, कोल्हापूर-धारवाड, पुणे-धारवाड व बेळगाव – शेडबाळ या मार्गावर काही निवडक दिवसांसाठीच या रेल्वे धावणार आहेत. यामुळे परीक्षार्थींना निश्चित वेळेत परीक्षास्थळी पोहोचता येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (मुंबई) ते मडगाव (रेल्वे क्र. 01147) ही रेल्वे दि. 5 रोजी सकाळी 11.05 वा. सुटणार आहे. त्यानंतर दादर, कल्याण, लोनावळा, पुणे, सातारा, सांगली, मिरज मार्गे बेळगावला रात्री 10.50 वा. बेळगावला त्या नंतर लोंढामार्गे पहाटे 4 वा. मडगावला पोहोचणार आहे. हीच रेल्वे (क्र. 01148) दि. 6 रोजी रात्री 8 वा. मडगाव येथून सुटणार आहे. त्यानंतर बेळगाव येथे 12.45 वा. येवून मिरज, सांगली, सातारा, पुणे लोणावळा, कल्याण, दादर मार्गे दुसऱया दिवशी दुपारी 1.05 वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पोहोचणार आहे.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनल (कोल्हापूर) ते मडगाव (रेल्वे क्र. 01149) ही रेल्वे दि. 5 रोजी 7.30 वा. कोल्हापूर येथून निघून मिरज मार्गे रात्री 11.20 वा. बेळगावला त्यानंतर लोंढा मार्गे पहाटे 4.30 वा. मडगावला पोहोचणार आहे. (रेल्वे क्र. 01150) ही रेल्वे दि. 6 रोजी रात्री 8.30 वा. मडगाव येथून निघून रात्री 1.15 वा. बेळगावला तर पहाटे 5.30 वा. कोल्हापूरला पोहोचणार आहे.
छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) ते धारवाड या दरम्यान धावणारी 01151 ही रेल्वे कोल्हापूर येथून दि. 5 रोजी रात्री 10 वा. निघणार आहे. मिरज मार्गे बेळगाव येथे रात्री 2 वाजता तर धारवाड येथे पहाटे 4.50 वा. पोहोचणार आहे. हीच रेल्वे (क्र. 01152) दि. 6 रोजी रात्री 9 वा. धारवाड येथून निघून बेळगाव येथे 11.45 वा. पोहोचणार आहे. पुढे मिरज मार्गे पहाटे 4 वाजता कोल्हापूरला पोहोचणार आहे.
पुणे – धारवाड या दरम्यान धावणारी (01153) ही रेल्वे दि. 5 रोजी सायंकाळी 5 वा. पुणे येथून निघणार आहे. सातारा, सांगली, मिरज मार्गे रात्री 1 वा. बेळगाव तर पहाटे 5.50 वा. धारवाडला पोहोचणार आहे. तर हीच रेल्वे दि. 6 रोजी धारवाड येथून रात्री 8 वा. निघून बेळगावमध्ये 10.45 वा. पोहोचणार आहे. मिरज, सांगली, सातारा मार्गे दुसऱया दिवशी सकाळी 7.50 वा. पुण्याला पोहोचणार आहे.
चौकट करणे
परीक्षांसाठी बेळगाव- शेडबाळ मार्गावर पॅसेंजर स्पेशल रेल्वे दि. 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान धावणार आहे. सकाळी 7.55 वा. बेळगाव येथून निघणारी ही रेल्वे सुळेभावी, सुळढाळ, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची मार्गे सकाळी 10.20 वा. शेडबाळला पोहोचणार आहे. तर शेडबाळ येथील सायंकाळी 4.15 वा. निघुन 6.40 वा. बेळगावला पोहोचणार असल्याचे नैऋत्य रेल्वेने कळविले आहे.









