राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार
ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची लाट पुन्हा आपल्या राज्यात आली की नाही हे पुढील आठ – पंधरा दिवसात कळेल. मात्र आता थोडंसं बंधन तुमच्यावर आणणं गरजेचं आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार असल्याचे सांगितलं.
तसेच, मी जबाबदार ही नवीन मोहीम सुरु झाली असून, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा या तीन गोष्टी कराच. लॉकडाउन नको असेल तर नियम पाळा असे देखील म्हणाले.
Previous Articleगडमुडशिंगी येथील घरफोडी उघडकीस, पाच जणांना केली अटक
Next Article गस्तमध्ये झळकणार सैराटमधील बाळ्या








